# पुणे जिल्ह्यात 3 हजार 95 रूग्णांची वाढ; 55 जणांचा मृत्यू.

पुणे: पुणे विभागातील 48 हजार 455 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 84 हजार 455 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33 हजार 649 आहेत. आज जिल्ह्यात पुणे 17, पुणे महापालिका क्षेत्रात 28 व पिंपरी चिंचवड 10 असे एकूण 55 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विभागात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 921 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 68 हजार 686 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 41 हजार 399 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रूग्णसंख्या 25 हजार 617 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 17 हजार 736, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 528 व पुणे कॅन्टोन्मेंट 175, खडकी विभागातील 50, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 33 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 95 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 181, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 291 व पुणे कॅन्टोन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 90, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 44 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 662 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.27 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 50 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 95, सातारा जिल्ह्यात 125, सोलापूर जिल्ह्यात 233, सांगली जिल्ह्यात 166 तर कोल्हापूर जिल्ह्यात 431 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 3 हजार 98 रुग्ण असून 1 हजार 678 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 316 आहे. कोरोनाबाधित एकूण 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार 67 कोरोनाबाधित रुग्ण असून 3 हजार 727 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 906 आहे. कोरोनाबाधित एकूण 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 493 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 987 आहे. कोरोनाबाधित एकूण 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 4 हजार 111 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 189 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 823 आहे. कोरोनाबाधित एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *