म्हणे साध्वी कोरोना पळवण्याचा उपाय असे खास..
म्हणा हनुमान चालिसा कोरोना जाईल हमखास..!
म्हणे करावा जपाचा पाच वेळा पाट..
अनुष्ठान केल्याने कोरोनाचा होईल नायनाट..!
प्रभू रामचंद्र होतील प्रसन्न हमखास..
करतील कोरोनाचा नायनाट हमखास..!
कोणी म्हणे खा बिकानेरचा पापड..
कोरोनाला बसेल अनायसे झापड..!
-विलास इंगळे