पुणे: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय९१) यांचे बुधवारी पहाटे पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनावर मात केली होती. त्यांना कोविड पाॅझिटिव्ह वॉर्डमधून कोविड निगेटिव्ह वॉर्डमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पार्थिव मूळगावी निलंगा येथे आणले जाणार असून सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.