बीड: बीड शहर व बीड, शिरूर, केज व परळी तालुक्यातील काही संबंधित भागातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.
बीड शहरातील अजमेर नगर, कुंभारवाडा, लोणारपुरा, सय्यद नगर पांगरी रोड व शाहूनगर (संतोषी टॉकीजच्या शेजारील गल्ली), बीड तालुक्यातील घोसापुरी, परळी तालुक्यातील इंजेगाव व इमानतांडा, शिरूर तालुक्यातील वारणी, बारगजवाडी व सवसवाडी आणि केज तालुक्यातील होळ या भागातील संबंधित परिसरातील असलेले कंन्टेन्मेंट झोन शिथील करण्यात आले आहे. या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.