# पुणे जिल्ह्यात आज 2 हजार 331 रूग्णांची वाढ; एकूण  97  हजार 309 कोरोनाबाधित.

पुणे:  पुणे विभागातील  81 हजार 764 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 967 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 961  आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 97  हजार 309 बाधित रुग्ण  असून कोरोनाबाधित  68 हजार 775 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26  हजार 303 आहे.  पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 2  हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.68  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29  टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 370 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 331, सातारा जिल्ह्यात 198, सोलापूर जिल्ह्यात 332 ,  सांगली जिल्ह्यात 229 तर कोल्हापूर जिल्ह्यात 280 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोनाबाधित  4 हजार 747 रुग्ण असून 2 हजार 349  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 252  आहे. कोरोनाबाधित एकूण 146  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 9 हजार 822 कोरोनाबाधित रुग्ण असून 6  हजार  13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 281 आहे. कोरोनाबाधित एकूण 528  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोनाबाधित 3 हजार 669 रुग्ण असून 1 हजार 16 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 545 आहे. कोरोनाबाधित एकूण 108  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 420  कोरोनाबाधित रुग्ण असून 3  हजार 611 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 580 आहे. कोरोनाबाधित एकूण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *