# कंटेन्मेंट झोन तत्काळ जाहीर होण्यासाठी आता तालुकास्तरावर अधिकार

बीड: कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यासाठी लागणारी माहिती तालुका स्तरावरुन प्राप्त होण्यास विलंब होतो त्यामुळे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यास उशीर होऊ नये यासाठी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंटेन्मेंट झोन तत्काळ जाहीर होण्यासाठी तालुकास्तरावर अधिकार देण्यात आला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी जिल्ह्यात दररोज 100 च्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे असा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे याबाबतची नियमावली तयार करण्यात आली असून निर्गमित करण्यात आली आहे.

कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर शहरी भागातील कंटेन्मेंट झोन स्थान निश्चितीबाबत कार्यवाही मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी करावी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना कंटेन्मेंट झोनबाबत तत्काळ कळवावे. यासाठी स्थानिक पोलिस निरीक्षक यांची मदत प्रत्येक वेळी घ्यावी.

ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोन स्थान निश्चितीबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी कंटेन्मेंट झोनबाबत कार्यवाही करावी. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी तहसीलदार यांना विनाविलंब द्यावी. त्यानुसार तहसीलदार यांचे कंटेन्मेंट झोन घोषित करण्याचे आदेश व कालावधी संपल्यानंतर नियमाप्रमाणे शिथील आदेश देण्यात येणार आहेत

प्रभावीपणे, कार्यक्षमतेने व्यवस्थापित करता यावे यासाठी निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत समूह, गल्ली वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेन्मेंट झोन असे क्षेत्र असू शकेल

यापेक्षा मोठे क्षेत्र संपूर्ण तालुका किंवा नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र इत्यादी झोन घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *