# पुणे जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख; औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण.

पुणे: पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी हापकीन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांची तर औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते, तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिवपदी बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. राज्यातील अन्य चार आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये एस. ए. तागडे यांची प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्रालय, मुंबई या पदावर बदली झाली आहे. पराग जैन यांची नियुक्ती सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई या पदावर, डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, हापकीन इन्स्टिट्यूट मुंबई, या पदावर तर संदीप कदम यांची बदली भंडारा जिल्हाधिकारीपदी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *