# संगीत शंकर दरबारमधील पं.जसराज यांच्या आठवणींना उजाळा.

नांदेड: संगीत मार्तंड पद्मभूषण पंडित जसराज यांनी २०११ मध्ये नांदेड येथील संगीत शंकर दरबारमध्ये हजेरी लावली होती. त्यांनी त्यावेळी नांदेडकरांना शास्त्रीय गायनाने मंत्रमुग्ध केले होते.

नांदेड भेटीत त्यांनी सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले होते. तसेच सुमधुर आवाजात परिक्रमा केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत पंडित नाथ नेरळकर व छायाचित्रकार विजय होकर्णे उपस्थित होते.

या आठवणींना विजय होकर्णे यांनी उजाळा दिला असून त्यांनी त्यांच्या संग्रहातील छायाचित्रेही खास maharashtratoday.live
साठी उपलब्ध करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *