# पुणे जिल्हाधिकारी पदाची सूत्रे डाॅ.राजेश देशमुख यांनी स्वीकारली.

पुणे: पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍याकडून त्‍यांनी पदभार स्‍वीकारला. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर बदली झाल्याने डाॅ. राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. आज डाॅ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *