# मुदखेडचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; बळेगाव बंधार्‍यातून मिळणार 1.84 दलघमी पाणी.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड: भोकर, अर्धापूर येथील पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटविला आहे. विशेष प्रयत्न करून मंत्री चव्हाण यांनी बळेगाव उच्च पातळी बंधार्‍यातील सुमारे 1.84 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मुदखेड शहरासाठी आरक्षित केला आहे. त्यामुळे मुदखेड शहराला पुढील तीस बत्तीस वर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रश्न जातीने सोडविता यावे म्हणून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवून घेतले. नांदेड शहरात कोरोना रुग्णांसाठी 200 बेडचे सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले. तसेच 13 हजार किलो लिटरचा ऑक्सीजन टँकही उपलब्ध करून दिलेला आहे. शहरासह ग्रामीण भागातही त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केलेले आहे. अर्धापूर शहरात व भोकर शहरात पाणीपुरवठा योजना आणून या दोन्ही शहरांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढलेला आहे. मुदखेड शहरालाही पाणी टंचाईची झळ बसत होती. शहराला लगतच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. पण ते पुरेसा नसल्याने शहरवासियांची पाण्यासाठी परवड होत होती. पण अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यावर भर दिला. या शहराची वाढती गरज लक्षात घेवून ना. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने बळेगाव उच्च पातळी बंधार्‍यातून मुदखेडसाठी तब्बल 1.84 दशलक्षघनमीटर पाणी मिळण्याचा प्रस्ताव 30 एप्रिल 2020 रोजी राज्य सरकारला सादर केला होता.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करून बळेगाव बंधार्‍यातून 1.84 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे मुदखेड शहराची सन 2051 पर्यंतची पाणी समस्या कायमस्वरुपी मिटली आहे. बळेगाव उच्च पातळी बंधार्‍याची 10.44 दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. त्यातील 30.55 टक्के म्हणजे 3.10 दलघमी पाणी घरगुती वापरासाठी राखीव आहे. त्यातील तब्बल 1.84 दलघमी पाणी मुदखेड शहरासाठी राखीव करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *