# बीडसह माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टीमध्ये दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी.

गणेशोत्सवासाठी सहा शहराचे निर्बंध शिथील; श्रीगणेश मूर्ती, हार-फुलांच्या दुकानांना परवानगी

बीड: गणेशत्सावाच्या दृष्टीने बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरासाठीचे निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. परंतु केवळ 2 फूट उंची पर्यंतच्या श्रीगणेश मूर्तीच्या दुकाने, फळे, भाजीपाला, दूध, मेडिकल, पूजेच्या साहित्यांची दुकाने व हार-फुलांची दुकाने या सर्व साहित्याची घाऊक व किरकोळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

तसेच कोरोना विषाणू संसर्गामुळे शहरामधील गर्दी नियंत्रीत करणे आवश्यक त्यासाठी शहरातील, गावातील वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण पसरलेली राहतील आणि एकाच ठिकाणी, रस्त्यावर राहणार नाहीत याची जबाबदारी संबधित नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांची राहील असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी दिले आहेत. परंतु यामध्ये सुशोभीकरणाची साहित्य विक्री दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल रेस्टाॅरंट यांना व इतर सर्व प्रकाराच्या दुकांनाना उघडण्यास परवानगी असणार नाही. या विषयीचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील.

सर्वांनी कोविड-19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे. तसेच वरील शहरांमध्ये अँटिजन टेस्टची मोहीम चालू राहील त्यास सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य कारावे. कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध तसेच कायम राहतील. यापूर्वी कोरोना विषाणू रूग्णाची संख्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामूळे बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, केज व आष्टीे शहरे 10 दिवसांकरीता 21 ऑगस्ट रोजी रात्रीपर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद करण्यातआले होते. परंतु गणेशत्सावाच्या दृष्टीने हे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *