पुणे: पुणे विभागातील 1 लाख 66 हजार 440 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 27 हजार 938 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 55 हजार 436 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 62 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.02 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा: पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 1 लाख 64 हजार 525 रुग्णांपैकी 1 लाख 26 हजार 949 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 706 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.16 टक्के आहे.
सातारा जिल्हा: सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 12 हजार 888 रुग्णांपैकी 7 हजार 109 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 408 आहे. कोरोनाबाधित एकूण 371 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा: सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 17 हजार 415 रुग्णांपैकी 12 हजार 922 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 764 आहे. कोरोनाबाधित एकूण 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा: सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 10 हजार 735 रुग्णांपैकी 5 हजार 800 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 514 आहे. कोरोनाबाधित एकूण 421 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा: कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 22 हजार 375 रुग्णांपैकी 13 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 44 आहे. कोरोनाबाधित एकूण 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ: कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 120 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 70, सातारा जिल्ह्यात 670, सोलापूर जिल्ह्यात 294, सांगली जिल्ह्यात 442 तर कोल्हापूर जिल्ह्यात 644 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण: आजपर्यंत विभागामध्ये एकूण 10 लाख 48 हजार 968 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 27 हजार 938 नमून्यांचा अहवाल सकारात्मक आहे.