पुणे: पुणे विभागातील 2 लाख 16 हजार 270 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 90 हजार 884 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 66 हजार 977 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 637 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा: पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 2 लाख 14 हजार 5 रुग्णांपैकी 1 लाख 59 हजार 986 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 805 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.43 टक्के आहे.
सातारा जिल्हा: सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 19 हजार 609 रुग्णांपैकी 11 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 622 आहे. कोरोनाबाधित एकूण 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा: सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 21 हजार 667 रुग्णांपैकी 15 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 226 आहे. कोरोनाबाधित एकूण 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा: सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 18 हजार 281 रुग्णांपैकी 9 हजार 917 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 661 आहे. कोरोनाबाधित एकूण 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा: कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 29 हजार 922 रुग्णांपैकी 19 हजार 325 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 663 आहे. कोरोनाबाधित एकूण 934 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ: कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 21 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 619 सातारा जिल्ह्यात 621, सोलापूर जिल्ह्यात 403, सांगली जिल्ह्यात 573 तर कोल्हापूर जिल्ह्यात 305 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण: आजपर्यंत विभागामध्ये एकूण 13 लाख 38 हजार 800 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 90 हजार 884 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.