# पदोन्नतीमधील आरक्षणाची सद्य़स्थिती या विषयावर रविवारी वेबिनार.

उर्जामंत्री नितीन राऊत यांचा सहभाग

पुणे: स्वतंत्र मजदूर युनियन व संलग्न संघटना यांच्या वतीने रविवार, 13 सप्टेंबर रोजी पदोन्नतीमधील आरक्षणाची सद्य़स्थिती, या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उर्जामंत्री नितीन राऊत व अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील हे राहणार आहेत.

रविवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत होणाऱ्या या वेबिनारमध्ये सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता इंदिरा जयसिंग व अधिवक्ता डॉ. के. एस. चौहान हे सहभागी होऊन विचार मांडणार आहेत. झूम ऍपच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी मिटिंग आयडी: 81769421738 व पासवर्ड: 106826 असा आहे. वेबिनार वेळेवर सुरू होणार असल्याने दहा मिनिटे अगोदर सहभागी व्हावे असे आवाहन स्वतंत्र मजदूर युनियनचे प्रसिद्धी सचिव एन. बी. जारोंडे व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके यांनी सर्व संलग्न संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *