# संकट काळात डाॅक्टरांनी अधिक सतर्क राहावे -खा.डॉ. प्रितमताई मुंडे.

स्वाराती रुग्णालय, लोखंडी सावरगाव कोविड रुग्णालयास भेट देऊन घेतला आढावा

अंबाजोगाई: बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वर्तमान काळ हा संकटाचा असून जिल्ह्यात वाढत असलेला मृत्यूदर चिंतेचा विषय आहे. डॉक्टर परिचारिका रात्रंदिवस परिश्रम करीत असले तरी डॉक्टरांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, अशा सूचना त्यांनी बैठकीत बोलताना केल्या.

खा. प्रितमताई मुंडे यांनी येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेवून परस्थितीचा अढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी यावेळी आवश्यक माहिती दिली. खासदारांचा समोर मांडली. यावेळी डॉ.राकेश जाधव, डॉ.बिराजदार, डॉ.नितीन चाटे यांनी चर्चेत सहभाग घेतला. ऑक्सीजन प्लान्ट, जम्बो सिलेन्डर यांची माहिती खासदारांनी घेतली. प्रशांत आदनाक यांनी फोनबाबत तक्रार मांडली, हा प्रश्न बैठकितच मार्गी लावला.

यावेळी खासदार मुंडे म्हणाल्या सध्याचा संकटाचा काळ आहे, संसर्ग वाढत आहे, या ठिकाणी सर्व डॉक्टर चांगले काम करत आहेत, तरी पण वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी अरोग्य यंत्रणेनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

दरम्यान, खासदारांनी लोखंडी सावरगाव येथे असलेल्या कोविड सेंटरला भेट देवून परस्थितीचा अढावा घेतला. जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सेंटरमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा सादर केला. खासदार मुंडे ह्या स्वतः डॉक्टर असल्याने दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *