पुणेः शहरातील बंडगार्डन पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा गोळ्या घालून व्यावसायिकाचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये खून झालेल्याचे नाव राजेश कानाबार (वय63, बांधकाम व्यावसायिक) असे आहे. ही हत्या जागेच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेजवळ राजेश कानाबार
यांच्यावर चालत आलेल्या आरोपीने गोळीबार केला. कानाबार यांना उपचारासाठी तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ सील केले असून तपास सुरु केला आहे. कोणत्या कारणातून गोळीबार करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकले नाही.