# अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी दाखल केला आणखी एक गुन्हा.

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग नंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम 353 नुसार अर्णब गोस्वामीवर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *