# संत सेवालालजी महाराजांचा वारसा महंत बाबुसिंगजी महाराज समर्थपणे चालवतील.

नांदेड: संत सेवालालजी महाराजांचा लोककल्याण, सेवा व प्रबोधनाचा वारसा महंत बाबुसिंगजी महाराज समर्थपणे चालवतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

पोहरादेवी संस्थानचे प्रमुख व बंजारा समाजाचे धर्मगुरू संत तपस्वी डॉ.रामरावजी महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून महंत बाबुसिंगजी महाराज यांची निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. या निवडीबद्दल अभिनंदन करताना ते म्हणाले की, डॉ.रामरावजी महाराज यांच्या प्रमाणेच महंत बाबुसिंगजी महाराज देखील संत सेवालालजी महाराजांचा लोककल्याण, सेवा व प्रबोधनाचा वारसा समर्थपणे चालवतील, याचा मला विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *