# दक्षिण मध्य रेल्वेच्या 10 विशेष गाड्यांना मुदतवाढ, वेळेतही बदल.

नांदेड: प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागातून विशेष गाड्या चालवत आहे. या पैकी 10 विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत.  अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे

1. गाडी संख्या 07614 नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 31.12.2020 ते 19.01.2021  दरम्यान रोज धावेल.

2. गाडी संख्या 07613  पनवेल ते नांदेड विशेष गाडी दिनांक 01.01.2021  ते 20.01.2021 दरम्यान रोज धावेल.

3. गाडी संख्या 07049 हैदराबाद ते औरंगाबाद विशेष गाडी दिनांक 31.12.2020  ते 19.01.2021 दरम्यान  रोज धावेल.

4. गाडी संख्या 07050 औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दिनांक 01.01.2021  ते 20.01.2021  दरम्यान  रोज धावेल.

5. गाडी संख्या 02765 (द्वी-साप्ताहिक) तिरुपती ते  अमरावती विशेष गाडी दिनांक 02.01.2021 ते 16.01.2021दरम्यान दर मंगळवार आणि शनिवार रोज धावेल.

6. गाडी संख्या 02766  (द्वी-साप्ताहिक) अमरावती ते तिरुपती विशेष गाडी दिनांक 04.01.2021 ते 18.01.2021  दरम्यान दर गुरुवार आणि सोमवारी धावेल.

7. गाडी संख्या 02720  (द्वी-साप्ताहिक) हैदराबाद ते जयपूर विशेष गाडी दिनांक 30.12.2020  ते 18.01.2021  दरम्यान दर सोमवार आणि बुधवार धावेल.

8. गाडी संख्या 02719 (द्वी-साप्ताहिक) जयपूर ते हैदराबाद विशेष गाडी दिनांक 01.01.2021  ते 20.01.2021 दरम्यान  दर बुधवार आणि शुक्रवार धावेल.

9. गाडी संख्या 07610 (साप्ताहिक) पूर्णा  ते पटना विशेष गाडी दिनांक 31.12.2020  ते 14.01.2021 दरम्यान दर गुरुवारी धावेल.

10. गाडी संख्या 07609 (साप्ताहिक) पटना ते पूर्णा  विशेष गाडी दिनांक 02.01.2021  ते 16.01.2021 दरम्यान दर शनिवार धावेल.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *