# निवृत्तीवेतन धारकांना 28 फेब्रुवारी पर्यंत हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ.

औरंगाबाद: महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दि. 8 डिसेंबर 2020 अन्वये राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तसेच निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांनी संबंधित बँकामध्ये जाऊन 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत कोषागार कार्यालयाच्या यादीवर स्वाक्षरी करावी अथवा जीवन प्रमाण प्रणालीव्दारे ऑनलाईन प्रमाणपत्र सुद्धा सादर करता येईल, असे आवाहन आर.बी. लिंगनवाड, वरिष्ठ कोषागार अधिकारी, सचिन अन्नपूर्वे, अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) औरंगाबाद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *