# दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग आक्रमक.

नवी दिल्ली: भारताविरोधात प्रचार केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यावर ग्रेटा थनबर्गने प्रतिक्रिया दिली आहे.कोणत्याही धमकीचा मला काहीही फरक पडणारी नाही. माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहिल, असं ग्रेटा म्हणाली आहे.

ग्रेटा ने यासंदर्भात ट्विट केलं आहे.भारतातील शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. कोणताही द्वेष, धमकी माझी मानवी हक्कांबाबतची भूमिका बदलू शकत नाही, असं ग्रेटाने सांगितलं आहे. दरम्यान, पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केलं होतं. याला ग्रेटा थनबर्गने समर्थन दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *