नांदेड: नांदेड रेल्वे विभागातील बदनापूर ते करमाड रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे पटरी नवीनीकरण चे काम करण्यात येत आहे. याकरिता तीन तासांचा लाईन ब्लॉक (ट्राफिक ) घेण्यात आला आहे. हा ब्लॉक दुपारी १५.२० पासून ते १८.२० पर्यंत घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक आठवड्यातून तीन दिवस रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक २३, २५, २८ आणि ३० मार्च ला तसेच दिनांक ०१, ०४, ०६, ०८, ११, १३, १५, १८, २०, २२ आणि २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
या तीन तासांच्या ब्लॉक मुळे गाडी संख्या ०७०५० औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दिनांक २३, २५, २८ आणि ३० मार्च ला तसेच दिनांक ०१, ०४, ०६, ०८, ११, १३, १५, १८, २०, २२ आणि २५ एप्रिल ला औरंगाबाद येथून १२५ मिनिटे उशिरा सुटेल, म्हणजेच तिची नियमित वेळ दुपारी १६.१५ वाजता ऐवजी सायंकाळी १८.२० वाजता सुटेल.