# एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार.

कोरोनामुळे अंबाजोगाईतील परिस्थिती विदारक

अंबाजोगाई: शहरातील स्वाराती रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज शंभरच्या पुढे वाढत असताना मृत्यूचा दर देखील झपाट्याने वाढत आहे.

स्वाराती रुग्णालयात सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात आला. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अंबाजोगाईत मरण स्वस्त झाले असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *