राज्यात आज चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक 41.2
पुणे: मराठवाडा व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. मराठवाडा ते दक्षिण किनारपट्टी पर्यंत (अंतर्गत कर्नाटक मार्गे) उत्तर दक्षिण कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे 25 ते 27 एप्रिल या कालावधीत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून विदर्भातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज पुणे येथील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आज राज्यातील सर्वात जास्त तापमान 41.2 अंश सेल्सिअस एवढे चंद्रपूर येथे नोंदले गेले.
गेल्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण गोव्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या 25 ते 27 एप्रिल या तीन दिवसात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून विदर्भातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान पुढील प्रमाणे (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) 34, सांताक्रूज 35.3, अलिबाग 32.9, रत्नागिरी 33.7, पणजी (गोवा) 33.8, डहाणू 33.8, पुणे 37.7, जळगाव 38.4, कोल्हापूर 37.1, महाबळेश्वर 31.1, मालेगाव 38.0, नाशिक 36.1, सांगली 38.6, सातारा 37.1, सोलापूर 40.8, औरंगाबाद 37.8, परभणी 40.1, नांदेड 39.0, अकोला 39.6, अमरावती 39.0, बुलढाणा 36.5, ब्रम्हपुरी 41.1, चंद्रपूर 41.2, गोंदिया 37.4, नागपूर 40.0, वर्धा 40.4.