नांदेड: कमी प्रवासी संखेमुळे जालना– मुंबई सी.एस.टी.एम. जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती, ती शुक्रवार, 25 जूनपासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. ही माहिती नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
१.गाडी संख्या ०२२७१ मुंबई सी.एस.टी.एम. ते जालना जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस मुंबई सी.एस.एम. टी. येथून २५ जून २०२१ पासून धावणार आहे.
२.गाडी संख्या ०२२७१ जालना ते मुंबई सी.एस.टी.एम. जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस जालना येथून २६ जून २०२१ पासून धावणार आहे.
गाडीच्या वेळा आणि थांबे पूर्वी प्रमाणेच असतील. यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. ही गाडी पूर्णतः आरक्षित असेल. गाडीमध्ये प्रवास करतांना केद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेले कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक असेल.