# आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन विशेष: समृद्ध निसर्गासाठी वाघांचे संरक्षण गरजेचे…

नांदेड: निसर्गाचा महत्वपूर्ण भाग असलेल्या आणि अन्नसाखळीचा अविभाज्य घटक असून वाघाचे संवर्धन आणि संरक्षणाच्या जनजागृतीचा आजचा दिवस. वाघ म्हणजे आपल्या वनांची आन, बान आणि शान. त्यामुळे समृध्द निसर्गासाठी व मानवाच्या सुदृढ जीवनासाठी वाघांचे संरक्षण करण्याचा संकल्प आज करूया. चंद्रपूर येथील अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बब्बर आणी माया या वाघ वाघिनीचे काही वर्षांपूर्वी छायाचित्रण करता आले याचा अभिमान आहेच..

आज भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या अत्यंत रोडावली आहे. ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. गेल्या शतकात माणसाने वाघांची अनिर्बंध शिकार केली. शिवाय जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्रही कमी केले; परिणामी, अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले आणि माणूस- वाघ संबंध आणखीच बिघडले. नामशेष होण्याच्या जवळपास पोहचलेल्या वाघांचे जतन संवर्धन  करण्याची आणि त्यांचे अधिवास क्षेत्र वाढविणे त्यांचे संरक्षण आणि याच बरोबर  वाघांच्या मृत्यूचे वाढत असलेले प्रमाण थांबविण्यासाठी. प्रयत्न होत असताना कडक कायद्याची अंमलबजावणी होत आहे.

वाघांचे नैसर्गिक मृत्यू, शिकार व अपघाती  मृत्यू कमी करण्यासाठी लक्ष केंद्रीत करून ठोस उपाय  योजनेची आवश्यकता  निर्माण झाली आहे. त्यासाठी आता राज्य आणी केंद्र शासनही जबाबदारीने पुढाकार घेत आहे आपल्या देशाचं हे वैभव “एक था टायगर ” आणि टायगर अभि जिंदा है या पलीकडे जावून जपलच पाहिजे.. हे आपल्या सर्वांचच कर्तव्य आहे.

छायाचित्रे व संकलन: वन्यजिव छायाचित्रकार विजय होकर्णे, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *