१४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मार्ग बदलून धावणार
नांदेड: या कार्यालानाने दिनांक ९ ऑक्टोबर रोजी प्रेस नोट द्वारे गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान आणि गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली असल्याचे कळविले होते. परंतु जनतेची मागणी लक्षात घेवून ही गाडी रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे ने बदलला आहे. आता १४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान ही गाडी पूर्वी प्रमाणेच परंतु बदलेल्या मार्गाने धावेल.
1)गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पवनेल एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणेच नांदेड येथून सुटेल, परंतु १४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान ही गाडी बदलेल्या मार्गाने म्हणजेच लातूर रोड, कुर्डूवाडी, मिरज, पुणे या मार्गाने धावेल.
2) गाडी संख्या ०७६१३ पवनेल ते नांदेड एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणेच पनवेल येथून सुटेल. परंतु १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान ही गाडी बदलेल्या मार्गाने म्हणजेच पुणे, मिरज, कुर्डूवाडी, लातूर रोड या मार्गाने धावणार आहे.