औरंगाबाद: शहरातील देवानगरी येथील रहिवाशी पोलीस निरिक्षक राजकुमार सोनवणे यांची औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुकत म्हणून पदोन्नती झाल्याचा देवानगरी वासियांना आनंद झाला. देवानगरी परिसरातील एक पोलीस अधिकारी म्हणून व परिसरात सामाजिक कामात श्री. सोनवणे हे हिरीरिने भाग घेतात त्यात श्री. सोनवणे यांची पदोन्नती झाल्याचा आनंद म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी श्री. सोनवणे व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ. मिनाक्षी सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार केला.
यावेळी केंद्र सरकार सामाजिक मंत्रालय कडून देवानगरीचा युवक सागर बडवे यास रोल मॉडेल म्हणून निवड करण्यात आल्याने सागरचा सन्मान मा.राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आल्याने त्याचा ही सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमंत गोर्डे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवानंद वाडकर यांनी केले. यावेळी अक्षय नरोडे, राजीव बडवे, अमर नानकर, योगेश साळवे, प्रतीक गुप्ता, दिलीप पवार, संजू धर्मपरी, एसपीओ सुशिला श्रेत्रीय, विजय गांगवे, अनिल दिघेकर आदी उपस्थित होते.