# पुणे विभागात 29 हजार 839 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 3 क्विंटल भाजीपाल्याची आवक.

 

पुणे: सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 29 हजार 839 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 3 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 142 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 11 हजार 129 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात 24 एप्रिल रोजी 99.834 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, 23.157 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

विभागात 57,337 स्थलांतरित मजूर: सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 153 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 504 कॅम्प असे पुणे विभागात एकूण 657 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 57 हजार 337 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 29 हजार 807 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *