मुंबई: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने महामहिम राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पत्रमोहिमेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रपती महोदयांना आपल्या स्वाक्षरीचं पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. या उपक्रमांतर्गत मराठी भाषा विभागाच्यावतीनं साडेदहा हजार पत्रे महामहिम राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात येणार आहेत.