# धक्कादायक; बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी.

 

बीड: काल रविवारी बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित 7 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली होती. दरम्यान, आज सकाळी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

काल मुंबईहून आष्टी तालुक्यात आलेल्या सात रुग्णांपैकी एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. उर्वरित 6 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोनाबाधित कक्षात उपचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आष्टी तालुक्यातील पाटणसांगवी या गावी ही 7 कोरोनाबाधित रुग्ण अलिकडेच मुंबई येथून पाहुणे म्हणून आले होते. त्यांची करोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच या महिलेचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात सध्या आठ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

2 thoughts on “# धक्कादायक; बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी.

Leave a Reply to Surendra S Kulkarni Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *