मराठी रंगभूमी दिनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा

अंबाजोगाई: मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ८ नोव्हेंबर २०२३ रोजी, श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूल व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई शहरातील न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, मोदी लर्निंग सेंटरच्या निसर्गरम्य व प्रशस्त प्रांगणात  बुधवार दि ८ नोव्हेंबर दुपारी १ ते २:३० या वेळेत विविध वयोगटातील मुले, मुली , पुरुष व महिला  यांच्यासाठी भव्य अशा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी व नाट्य परिषद शाखा अंबाजोगाई च्या सचिव प्रा. संपदा कुलकर्णी यांनी केले आहे.

अंबाजोगाई शहराची ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा जोपासनण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद तसेच श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ हे सदैव नवनवीन सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतांना दिसून येतात. अंबाजोगाई शहरात नाट्य रसिकांची भूख भागविण्यासाठी श्रीमती संपदा कुलकर्णी व नाट्य परिषदेच्या वतीने सदैव विविध नाटकांचे आयोजन करण्यात येते. अंबाजोगाई नाट्य परिषद ही जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून तेथे अंबाजोगाई शहराची एक वेगळी ओळख निर्माण करत असते.

त्याचबरोबर शहरातील श्री बालाजी शिक्षक प्रसारक मंडळ हे देखील अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवात भर घालनारे शैक्षणिक मंडळ म्हणून नावरूपास आले आहे. या मंडळाच्या वतीने अंबाजोगाई शहर व परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याद्वारे या परिसरातील विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही.

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य अशा रांगोळी स्पर्धेत विविध वयोगटातील मुले-मुली, पुरुष व महिला या सहभागी होऊ शकणार आहेत. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना अनेक आकर्षक बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी एक तास आगोदर आपली नाव नोंदणी करणे आवश्यक असून आयोजकांचा निर्णय हा अंतिम असेल. तेव्हा मोदी लर्निंग सेंटरच्या प्रशस्त व खुल्या प्रांगणात आयोजित या भव्य रांगोळी स्पर्धेस अंबाजोगाई शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन राजकिशोर मोदी व अखिल भारतीय नाट्य परिषद अंबाजोगाई च्या सचिव  प्रा. संपदा कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *