मुंबई: संत रोहिदास महामंडळ चे MD आणि CEO तसेच इतर प्रमुख अधिकारी यांचे बरॊबर कक्कया कल्याण मंडळ चे पदाधिकारी यांची बैठक फोर्ट येथील कार्यालय येथे नुकतीच झाली. या बैठकित ढोर समाज बांधवांसाठी “संत कक्कया चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ” निर्मितीबाबत बैठकित सकारात्मक चर्चा करण्यात आल्याची माहिती मंडळाचे सहसचिव सूर्यकांत इंगळे यांनी दिली.
बैठकिस श्री. गजभिये एमडी आणि सीईओ यांच्यासह कक्कया कल्याण मंडळाचे अध्यक्ष महादेव शिंदे, प्रवक्ते रवींद्र शिंदे, सचिव यशवंत नारायणकार, सहसचिव सूर्यकांत इंगळे, सदस्य हनुमंत सोनावणे, गोविंद खरटमोल आदी उपस्थित होते. बैठकिच्या अनुषंगाने ढोर जातीसाठी स्वतंत्र शासकीय महामंडळ “संत कक्कया चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ” ह्या नावाने निर्माण करणे बाबतचा रितसर प्रस्ताव संत रोहिदास महामंडळ चे MD आणि CEO येत्या तयार करून मंत्रालयात मंजूरीसाठी पाठावण्यात येईल. तसेच इतर मागण्या बाबत उदा MIDC प्लॉट, कर्ज योजना मधील सुधारणा, सहकारी संस्था स्थापन करून उद्योग निर्मितीसाठी चालना, उदा. म्हसवड, बारामती, सोलापूर इत्यादी महाराष्ट्रातील भागांना प्रत्यक्ष भेट देऊन ढोर जातीसाठी चर्मोद्योग किंवा इतर उद्योग बाबत योजना राबवणे, कत्तलखान्यातील कातडे, साल, चुना इत्यादी कच्चा माल या बाबत ढोर जातीसाठी राखीव. ह्या आणि इतर विविध प्रश्नांवर सविस्तर सकारत्मक चर्चा झाली. यावेळी महादेव कृष्णा शिंदे, रवींद्र रुपचंद शिंदे, यशवंत नारायणकार आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्यातील वीरशैव ककया ढोर समाजाला शासनाने स्वतंत्र शासकीय महामंडळ द्यावे याबाबत समाजाचे आमदार ज्ञानराज चौगुले (उमरगा) यांनी आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याना पत्र लिहून डॉ. ज्ञानेश्वर साबणे , सुर्यकांत इंगळे, गोविंद खरटमोल यांना सोबत घेऊन मा. मुख्यमंत्री महोदय यांची दि. २५/७/२०२३रोजी सायंकाळी ७ वाजता सभाग्रहात भेट घेऊन महामंडळ ची मागणी केली याप्रमाणे मा. मुख्यमंत्री महोदयांनी सदर पत्रावर मा. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग याना महामंडळ बाबतचा प्रस्ताव तात्काळ तपासून सादर करा असे आदेश दिले आहेत.