“होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

अंबाजोगाई: अंबाजोगाई शहराचे लाडके व्यक्तिमत्त्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे क्रांतीनाना मळेगावकर व कु. सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत “होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा” हा मनोरंजनात्मक व स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अंबाजोगाई शहरातील दोन ते अडीच हजार महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. 

कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी मनोज लखेरा, संतोष शिनगारे,  ॲड अनिल लोमटे, गोविंद पोतंगले, गणेश मसने, प्रकाश लखेरा हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सादरकर्ते क्रांतीनाना मळेगावकर व कु. सह्याद्री मळेगावकर यांनी कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना आपल्या मनोरंजनाच्या सादरीकरणाने अक्षरशः खिळवून ठेवले होते.

होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात सर्व सहभागी महिला व विजेत्या सर्व महिलांना आकर्षक अशी बक्षिसांची लयलूट करण्यात आली. या कार्यक्रमात २५० च्या वर बक्षिसांचा खजिना याप्रसंगी ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की, शिलाई मशीन, टेबल फॅन, सायकल, सिलिंग फॅन, मिक्सर, कुकर, भिंतीवरील घड्याळ, ट्रॅव्हल बॅग, पांघरण्याची जाड रग या व अशा अनेक प्रकारच्या बक्षिसांची मेजवानी यावेळी राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली होती. 

या कार्यक्रमात विविध वयोगटातील महिला, ज्यामध्ये ज्येष्ठ महिलांना देखील सामील करवून घेऊन त्यांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून त्यांना मनोरंजनाच्या विश्वात घेवून गेले होते. महिला देखील या स्पर्धेत आपले दुःख व ताणतणाव विसरून उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम खेळतांना दिसून आल्या. रोजच्या कामकाजातून महिलांना बाहेर काढून त्यांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमात सहभागी स्पर्धक महिला खेळत खेळत विविध प्रकारची बक्षिसे पटकावत होत्या. बक्षीस जिंकून अनेक महिला भावूक होतांना दिसून येत होत्या. बोलताना उपस्थित महिला राजकिशोर मोदी यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देत होत्या. व यापुढेही महिलांसाठी असेच कार्यक्रम आयोजित करावेत अशी भावना उपस्थित सर्व महिला व्यक्त करत होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज लखेरा, विजय रापतवार, सुनील व्यवहारे, खालेद चाऊस, कचरू सारडा, गणेश मसने, सचिन जाधव, आनंद टाकळकर, अशोक जेधे, चेतन मोदी, दत्ता सरवदे, रफिक गवळी, अंकुश हेडे, हर्षवर्धन वडमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सहकारी यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *