30 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलात २०२०-२०२१ या नव्या शैक्षणिक वर्षापासून बी. व्होक (B.Voc) हा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरु होत आहे. रंगभूमी आणि अभिनय (थिएटर अँड अक्टिंग) असे या अभ्यासक्रमाचे नाव असून यूजीसीने या पदवी अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. नाट्यकलेची आवड असणारे आणि बारावी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
तीन वर्षाच्या या पदवी अभ्यासक्रमात अभिनय, शैली, अभिनय सिद्धांत, अभिनयाची तयारी, नाट्यप्रयोगाचे सादरीकरण इ. बाबींचा अभ्यास केला जाईल. नामवंत रंगकर्मीच्या कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येईल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर 2020 पूर्वी प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी संकुलाशी किंवा डॉ. अनुराधा जोशी (७०५७३४४४११) आणि प्रा. कैलास पुपुलवाड (९९२२६५२२०५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ.पी. विठ्ठल यांनी केले आहे.