डॉ.पांडुरंग पवार, डॉ.नंदकिशोर देशपांडे, डॉ.दिलीप खेडगीकर व डॉ. एस.जे.सावळकर याचा समावेश
अंबाजोगाई: शिक्षक दिनानिमित्त अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे शिक्षक अवार्ड जाहीर करण्यात आले असून वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या आणि सध्या रूग्णसेवेत कार्यरत असलेल्या व अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ज्येष्ठ सदस्यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि ऑनररी ॲम्पा टिचर्स अवार्ड जाहीर करण्यात आले आहेत. ही माहिती अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांनी दिली आहे.
यावर्षी हा सन्मान वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉ.पांडुरंग पवार, डॉ.नंदकिशोर देशपांडे, डॉ.दिलीप खेडगीकर व डॉ. एस.जे.सावळकर यांना जाहीर झाला आहे. अंबाजोगाईच्या इतिहासात अशा प्रकारचा पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे पुरस्कार निवडण्यासाठी डॉ.मनोज वैष्णव, डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.महेश ढेले व डॉ.योगिनी नागरगोजे यांची निवड समिती गठीत करण्यात आली होती. निवड समितीच्या निर्णयास कार्यकारिणीचे डॉ.विठ्ठल केंद्रे, डॉ.शीतल सोनवणे, डॉ.शिवाजी मस्के, डॉ.ऋषिकेश घुले, डॉ.इम्रान अली, डॉ.मनीषा पवार, डॉ.सुलभा पाटील, डॉ.विशाल भुसारे या सदस्यांनी एकमताने मान्य केला. या समितीने ठरवलेल्या निकषांप्रमाणे पुरस्कार जाहीर केलेले आहेत. शिक्षक दिनी हे पुरस्कार जाहीर करण्यात येत असून, लवकरच याचे वितरण करण्यात येईल अशी माहीती अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांनी दिली आहे.