पुणे: येरवडा कारागृहाच्या मैदानावर 29 जुलै 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत बाळासाहेब जालिंदर जाधव, तुरुंग अधिकारी श्रेणी 2, जालना कारागृह, यांची 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या अखिल भारतीय कारागृह कर्मचारी क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघामध्ये हॉलीबॉल या खेळामध्ये निवड झाली होती.
बाळासाहेब जाधव हे अखिल भारतीय कारागृह कर्मचारी क्रीडा स्पर्धेत यावेळी तब्बल सहाव्यांदा खेळणार आहेत. अखिल भारतीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. श्री. जाधव यांचे कारागृह कर्मचारी व गोंधळी तथा भटके विमुक्त समाजातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन होत आहे.