धनगर समाजाचे उपोषण सोडवण्यात अतुल सावे यांना यश

जालनाः जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने आज मागे घेण्यात आले. यावेळी मंत्री महोदय यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी ज्यूस घेऊन आमरण उपोषण सोडले. यावेळी राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित होते.

मागील 21 दिवसांपासून जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर समाजाच्यावतीने उपोषण सुरू होते. धनगर आरक्षणासह जामखेड येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ भगवान भोजने, देवलाल महाडिक, भगवान भोजने यांनी उपोषण सुरू केले होते. आज मंत्री सावे यांनी यांनी उपोषणस्थळी जावून उपोषणकर्त्यांशी संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन आरक्षण आणि इतर विषयावर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *