# हल्ला बोल: वाढता वाढता वाढे…

 

वाढता वाढता वाढे कोरोनाचा विळखा..
भांडता भांडता भांडे शासन प्रशासन..
जनता अन् रूग्ण कसे पचवतील हे हालाहल..?

वाढता वाढता वाढे कोरोनाचा विळखा..
शासन म्हणे प्रशासनाला, तुमच्या कार्यात नसे आमचा रोल..
आम्ही आलो निवडून आमचाही काहीतरी असेल होल्ड..?

वाढता वाढता वाढे कोरोनाचा विळखा..
प्रशासन म्हणे शासनाला, जातो आम्ही कोरोना रूग्णांच्या सेवेला..
तरीही शासनाचा राग राग आमच्याच राशीला..?

वाढता वाढता वाढे कोरोनाचा विळखा..
आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडे शासन प्रशासनाला..
आता तरी न भांडता पळवून लावा या कोरोनाला..?
-विलास इंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *