पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा पूर्व परीक्षा 2 डिसेंबर ऐवजी 10 डिसेंबर रोजी

नांदेड: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही शनिवार, 2 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे शुध्दीपत्रक क्रमांक एलटीडी-3417/सीआर-14/2017/जाहिरात दिनांक 29 नोव्हेंबर 2023 नुसार ही नियोजीत परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.

सदर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही रविवार, 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *